मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेले काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन झालं. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती. पण दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवल्याचंच वृत्त काँग्रेसकडून देण्यात आलं. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या निधनाने काँग्रेसचे सचिन सावंत यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘राजीववर ईश्वर प्रसन्न आहे, जे मागितले त्याला ईश्वर तथास्तु म्हणतो अशी नेहमी आमच्या सहकाऱ्यांमध्ये चर्चा असायची. पण ज्यावेळी खरी गरज होती त्यावेळी ईश्वराने हात काढून घेतला. हॉस्पिटलमधून मला माझ्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा कायम माझ्या हेलावलेल्या हृदयात कोरलेल्या राहतील.’ असे ट्विट सावंत यांनी केले आहे.
राजीववर ईश्वर प्रसन्न आहे, जे मागितले त्याला ईश्वर तथास्तु म्हणतो अशी नेहमी आमच्या सहकाऱ्यांमध्ये चर्चा असायची. पण ज्यावेळी खरी गरज होती त्यावेळी ईश्वराने हात काढून घेतला.
हॉस्पिटलमधून मला माझ्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा कायम माझ्या हेलावलेल्या हृदयात कोरलेल्या राहतील. pic.twitter.com/X3PYDmD6vy— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 16, 2021
दरम्यान, काल शनिवारी (१५ मे) काँग्रेसचे नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रूग्णालयात जाऊन, सातव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेत विचारपूस केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘राजीव सातव यांना काल रात्र थोडा त्रास जाणवला, मात्र ते लवकरच बरे होतील,’ असं म्हटलं होतं मात्र, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका ? वैद्यकीय तज्ञ म्हणतात…
- करुणा मुंडेच्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच सुरु झाला वाद, धार्मिक भावना दुखावल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
- रामगोपाल वर्मा १५ मे रोजी प्रदर्शित करणार स्वत:चा डिजीटल प्लॅटफॉर्म
- ‘कोरोनाच्या संकटकाळात फडणवीस आणि माझ्याइतकं काम कोणत्याच नेत्याने केलं नाही’
- ‘वडिलांची साथ नसेल तर ईदचा दिवसही उदासीन वाटतो’ ; सिराज वडिलांच्या आठवणीत झाला भावुक


