पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात एसएनडीटी येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. कोरोनाच्या संपूर्ण संकटकाळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केलं नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आम्ही कोरोनाच्या काळात सतत फिरत आहोत. आमच्या दोघांइतकं कोणताच नेता फिरला नसेल, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, राज्यातील कोविड परिस्थिती आणि मंत्रिमंडळातील नाराजीनाट्य आणि राज्यातील कोरोना परिस्थिती अशा विविध विषयांवर भाष्य केले. केंद्र सरकारने परदेशी लसींना अद्याप परवानगी न दिल्याने महाराष्ट्र सरकारची लस खरेदी रखडल्याचे अजित पवार म्हणतात. पण मग मुळात लसींना परवानगी नसताना त्यांनी ग्लोबल टेंडर हा शब्द उच्चारलाच कसा?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच मुंबई महानगरपालिकेप्रमाणे पुणे पालिकेला ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून लस खरेदीसाठी परवानगी दिली जात नसल्याच्या भाजप नेत्यांच्या आरोपात तथ्य असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
तसेच त्यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपरोधिक टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भेट घेतली. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री या निमित्ताने का होईना बैठका, भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी खरंतर मराठा आरक्षण, कोविड संकट यांच्याबाबतीत त्यांनी डबल मास्क, पीपीई किट घालून एक ते दीड वर्षांपूर्वीच या गोष्टी करायला हव्या होत्या. मात्र, आता का होईना ते भेटी गाठी घेत आहेत ही त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणावी लागेल अशा शब्दात पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना उपरोधिकपणे टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘वडिलांची साथ नसेल तर ईदचा दिवसही उदासीन वाटतो’ ; सिराज वडिलांच्या आठवणीत झाला भावुक
- बाप रे!! निधीच्या ‘कोको’ला शोधून दिल्यास १ लाख रुपये मिळणार
- आमीर खानने ‘रंगीला’ चित्रपटानंतर राम गोपाल वर्मा यांच्यासोबत ‘या’ कारणांमुळे केले नव्हते काम
- ‘जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है…’
- ‘वाह रे मोदी तेरा खेल, सोने के दाम में बिकता तेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

