मुंबई : ९०च्या दशकातील यशस्वी दिग्दर्शक म्हणून ख्याती असलेले राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा आगामी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्यांनी स्वत:चा ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित करणार आहे. ‘स्पार्क ओटीटी’ असे या डिजीटल प्लॅटफॉर्मचे नाव असणार आहे.
मागील वर्षापासुन सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर मनोरंजन क्षेत्राला ओटीटी प्लॅटफॉर्मने तारले आहे. चित्रपटगृहे बंद असल्याने अनेक चित्रपट हे ओटीटी या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा पर्याय अवलंबत आहे. या काळात अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उदयास आले. आता यात आणखी एका नावाची भर पडणार आहे. बॉलीवूडचे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी त्यांचा चित्रपट ‘डी-कंपनी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ‘स्पार्क ओटीटी’ या नविन प्लॅटफॉर्म प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला. यावेळी ते म्हणाले,’माझा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची बंधने मला नको आहेत त्यामुळे मी स्वत:चा ओटीटी प्लॅटफॉर्म आणला आहे.’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म आज म्हणजे १५ मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या व्यासपीठावर इतर ओटीटीप्रमाणेच टीव्ही शो, चित्रपट, लघु मालिका, वेब सिरीज दिसतील. विशेष म्हणजे राम गोपाल वर्माचा पुढील चित्रपट ‘डी कंपनी’ फक्त याच व्यासपीठावर प्रदर्शित होईल.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाच्या संकटकाळात फडणवीस आणि माझ्याइतकं काम कोणत्याच नेत्याने केलं नाही’
- ‘वडिलांची साथ नसेल तर ईदचा दिवसही उदासीन वाटतो’ ; सिराज वडिलांच्या आठवणीत झाला भावुक
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवले
- काय सांगताय! फरहान अख्तर अन तेही मार्वल स्टुडीओजच्या चित्रपटात
- गुड न्यूज : ‘या’ तारखेला होणार भारतात मॉन्सूनचे आगमन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

