Share

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका ? वैद्यकीय तज्ञ म्हणतात…

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. देशात दररोज ३.५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत आहेत तर ४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशात काही वैद्यकीय तज्ञांनी देशात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याच बोललं जात आहे.

एका हिंदी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार तिसऱ्या लाटेला घाबरण्याचं किंवा चिंता करण्याची गरज नाही. तिसरी लाट लहान मुलांना जास्त प्रभावित करेल याचे काही पुरावे नाहीत असे बालरोग तज्ज्ञ आणि वॅक्सीन तज्ज्ञ डॉ. संजय मराठे म्हणाले आहेत. कोणतेही कागदोपत्री किंवा महामारी विज्ञानाचे काहीच पुरावे नाही की, संभावित तिसऱ्या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणात प्रभावित होतील. सगळं काही आकड्यांवर आधारित आहे. अस देखील मराठे म्हणाले आहेत.

डॉ. संजय मराठे म्हणाले की, सरकारच्या अंदाजाच्या आधारावर तयारी सुरू करण्यात आली आहे. जी चांगली बाब आहे. आपल्याला भविष्यात लहान मुलांसाठी हॉस्पिटल्स आणि जास्त बेड्सची तसेच आयसीयूची गरज आहे. पण याने आई-वडिलांनी घाबरण्याची गरज नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!