Share

करुणा मुंडेच्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच सुरु झाला वाद, धार्मिक भावना दुखावल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Published On: 

मुंबई : बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीने लवकरच त्यांच्या प्रेमासंबंधीची माहिती पुस्तक स्वरूपातून प्रकाशित करणार असल्याचे फेसबुक पोस्ट मधून सांगितले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे. आता पुन्हा करुणा मुंडे आणि धनजंय मुंडे यांच्या नात्यासंबंधीच्या चर्चेला उधाण आले आहे.या बातमीमुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच यावरून वाद सुरू झाले आहेत. करुणा यांनी केलेल्या पोस्टमधील फोटोमुळं धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार आता थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी होली बायबल शब्दावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचं म्हटलं गेलं आहे. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

जगातील सर्वच ख्रिश्चन धर्मियांचा बायबल हा अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो. बायबलला अनन्य साधारण महत्त्व असून करूणा धनंजय मुंडे यांच्या फेसबूक अकाऊंटवरून केलेल्या पोस्टमधील पुस्तकाच्या मुखपृष्ठावर होली बायबल असे इंग्रजीत लिहून पुस्तकाचं प्रमोशन केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळं ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. त्यामुळं ही पोस्ट तात्काळ हटवावी. तसंच संबंधितांना असे कृत्य करण्यापासून परावृत्त करावं आणि योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर खासगी आयुष्याबद्दल खुलासा करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातूनच खुलासा करत, “तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीनं मी संबंध ठेवले होते. तिच्यापासून मला दोन मुलं आहेत,” अशी कबुली दिली होती. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र तक्रार मागे घेतल्यानंतर हा वाद शमला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!