औरंगाबाद : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे या भावंडातील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. २००९ च्या दरम्यान दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारस कोण ठरावा यासाठी यांच्यात सतत खटके उडाले. तेव्हापासून संधी मिळेल तेव्हा हे दोघेही एकमेकांवर राजकीय टीका करतात. कधी पंकजा यांच्याकडून चिमटे तर कधी धनंजय यांच्याकडून समाचार घेतला जातो. बीड जिल्ह्यात दोघांच्याही फटकेबाजीवरुन राजकारण सतत तापले जाते. असाच एक प्रकार परळीत पुन्हा एकदा पहायला मिळाला. मात्र, यावेळी धनजंय यांनी एका गोष्टीच्या माध्यमातून देव करतो ते भल्यासाठीच करतो असे सांगतिले. काय आहे ती गोष्ट, वाचा त्यांच्याच शब्दांत..
“एक राजा असतो. दरबारात बसल्या बसल्या त्याचं तलवार पुसायचं काम चालू असतं. यावेळी त्याचं थोडं लक्ष विचलित होतं. धारदार तलवारीने त्याच्या एका हाताचा अंगठा तुटतो. तितक्यात शेजारी उभा असलेला प्रधान म्हणतो, ‘राजे देव करतो भल्यासाठीच’. राजाला राग येतो. राजा आदेश देतो, या प्रधानाला काळ्या कोठडीत डांबा. प्रधानाला काळ्या कोठडीची शिक्षा होते.
बऱ्याच दिवसांनंतर राजाला हुकी येते की आपण शिकारीला जाऊ. राजा शिकारीला निघतो. सोबतीला सोनापती, आणखी थोडी फौज. दाट जंगलात राजा जातो. फौज मागे पडते. तिथले आदिमानव राजाला पकडतात. ते त्या राजाला त्यांच्या राजाकडं घेऊन जातात. त्यावेळी तिथे नरबळीची प्रक्रिया चालू असते. नेमकं त्याच वेळी त्यांना बरबळी हवा होता. आदिमानवांनी त्यांच्या राजाला सांगितलं, आम्ही नरबळी आणलाय. प्रथेप्रमाणे राजाला अंघोळ घातली गेली. पण अंघोळ घालत असताना एका वृद्ध आदिमानवाच्या लक्षात येतं याला तर अंगठा नाही. असा नरबळी नको. ते पाहिल्यानंतर आदिमानवांचा राजा त्या राजाला सोडून देतो.
सुटका झालेला राजा पळत पळत आपल्या राजवाड्यात येतो. आपल्या सैनिकांना आदेश देतो. प्रधानाला सोडा. प्रधानाला सोडलं जातं. राजा प्रधानाला मिठी मारतो. जंगलातला सगळा प्रकार राजा आपल्या प्रधानाला सांगतो. त्यावेळी प्रधान पुन्हा एकदा म्हणतो, राजे मी म्हटलं होतं ना तुम्हाला देव करतो तो सगळं भल्यासाठी करतो. पण राजे तुम्ही मला जेलमध्ये टाकलं. ते सुद्धा बरंच केलं. जर तुम्ही मला जेलमध्ये टाकलं नसतं तर मी तुमच्यासोबत जंगलामध्ये आलो असतो. मी सावलीसारखा तुमच्यासोबत असतो. नरबळीवेळी तुमचा अंगठा तुटला म्हणून त्यांनी तुम्हाला सोडलं असतं पण मला धरलं असतं. म्हणून संजय भाऊ देव करतो तो भल्यासाठीच करतो.”
गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना आपले राजकीय वारस जाहीर केले नाही आणि त्यांना उमेदवारी दिली नाही असे वक्तव्य परभणीचे आमदार गव्हाणे यांनी परळीतील जाहीर कार्यक्रमात केले. ते म्हणाले, ‘मी मुंडे साहेबांना म्हणालो होतो, पण साहेबांनी काही ऐकले नाही’. यानंतर धनंजय मुंडे बोलायला उठले त्यांनी मात्र जे झाले ते बरे झाले हे सांगताना ही राजाची गोष्ट सांगितली. यानंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
महत्वाच्या बातम्या
- मित्रानेच दारू पाजून केला खून; लखन सोनवणेच्या मृत्यूचे रहस्य उलगडले
- कळमनुरीच्या ‘त्या’ कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच
- अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
- प्रेयसीला भेटायला जायचे म्हणून पठ्ठ्याने चोरली दुचाकी; सेलू येथील घटना
- पूजाने संजय राठोड यांच्यामार्फत भावाला वन खात्यात नोकरीला लावले ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
