🕒 1 min read
औरंगाबाद: कोरोनाचा आकडा वाढत असताना दुसरीकडे लस घ्या असे वारंवार आवाहन केले जात असताना काहीजण याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधाची लस न घेतलेल्या १२६२ नागरिकांवर महापालिकेने महिनाभरात दंडात्मक कारवाई करुन तब्बल सहा लाख ३१ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती संपुष्टात आणण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय असल्याचे शासनाने व आरोग्य विषयक संघटनांची स्पष्ट केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याकडे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी लसीकरणाची पथके वाढवून लसीकरण केले जात आहे. नागरिकांमध्ये लसीकरणाबद्दल जागृती व्हावी यासाठी देखील उपक्रम हाती घेतले जात आहेत. ज्या नागरिकाने लसीचा एकही डोस घेतलेला नाही, त्या नागरिकाला पाचशे रुपयांचा दंड देखील केला जात आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या क्षेत्रात महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा व उपायुक्त सौरभ जोशी यांनी नागरि मित्र पथकांच्या माध्यमातून शहराच्या विविध भागातील नागरिकांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासण्याची मोहीम सुरु केले आहे. १६ डिसेंबर २०२१ ते १७ जानेवारी २०२२ या एक महिन्याच्या काळातील कारवाईचा लेखाजोखा महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
या एक महिन्याच्या काळात पंधरा नागरिक मित्र पथकांच्या माध्यमातून ७५ हजार ५० नागरिकांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासण्यात आले. त्यात १२६२ नागरिकांनी अद्याप लस घेतली नसल्याचे स्पष्ट झाले. या नागरिकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारून सहा लाख ३१ हजार रुपये वसुल करण्यात आले. लस न घेतलेल्या नागरिकांना दंड करण्याची कारवाई यापुढेही सुरु राहील असे डॉ. मंडलेचा यांनी कळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-
“मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची” अशी अवस्था फडणवीसांची झालीये; संजय राऊतांचे टीकास्त्र
-
लता मंगेशकर आजून ICU मध्ये, डॉक्टर म्हणाले त्यांच्यासाठी प्रार्थना करा
-
धक्कादायक! साताऱ्यात माजी सरपंचाने केली गरोदर वनरक्षक महिलेला मारहाण
-
“आमचा सातारचा वाघ घरी बसनार्यातला नाय…”, किरण मानेंची ‘या’ चित्रपटात लागली वर्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
