Share

प्रसिध्द कन्नड चित्रपट निर्माते प्रदीप राज यांचे कोरोनामुळे निधन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले (Kannada Filmmaker) प्रसिध्द चित्रपट निर्माते प्रदीप राज (Pradeep Raj) यांचं निधन (Passed Away) झालंय. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. आज ( गुरुवार) पहाटे ३ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होता. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. प्रदीप राज यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

येथे होणार अंत्यसंस्कार

त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी पाँडेचेरी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. प्रदीप राज यांच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीही भरून निघणारी नाही. त्यांना दोन मुले आहेत. दिवंगत चित्रपट निर्मात्याला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्यात येत असून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत प्रदीप राज यांचा ‘किच्चू’ हा चित्रपट करिअरच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरला. त्याचसोबत ‘गिरगटले’ ‘किराताका’ ‘होटी उरिवा किच्चिनल्ली’ यासारखे सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत उत्तम सिनेमांच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

सुपरस्टार अभिनेता यशसोबत एकहून एक हिट सिनेमे दिले. ‘किराताका’ या तमिळ चित्रपटाचा त्यांनी रिमेक केला. ‘किराताका’ या सिनेमांनी अनेक पुरस्कार आपल्या नावे केले. प्रदीप यांचा ‘किच्चू’ हा सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. हा सिनेमाही चांगलाच हिट झाला.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!