Share

राज्यातील महाविद्यालये सुरु होणार? उदय सामंत मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यासोबतच ओमायक्रॉनचे (Omicron) देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले असून शाळा ,कॉलेजही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आता शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आता शाळाबरोबरच राज्यातील महाविद्यालयेही सुरु होणार का, याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

राज्यातील महाविद्यालये चालू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करणार आणि प्रस्तावअंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार असल्याचे उदय सामंत (Uday Samant) यांनी ट्वीट करत म्हटले आहे. त्यामुळे अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री ठाकरेच घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत चर्चा होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री ठाकरेंना काल प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्यात याव्यात तसेच शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात यावे असा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर मंत्री आदित्य ठाकरेंनी कोविड टास्क फोर्सशी चर्चा करुन शाळा सुरू करण्याबाबत अनुकुलता दर्शवली आहे. त्यामुळे सोमवारपासून शाळा पुन्हा सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!