मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( Karnataka CM K.Chandrashekhar Rao) यांनी काल (२० फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. आमच्या भेटीचे चांगले परिणाम लवकरच दिसतील, असे संकेतही राव यांनी दिले.यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. मात्र कॉंग्रेस नेत्यांच्या भेटी टाळल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यावरच आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये ( BJP spokesperson Keshav Upadhye) यांनीही निशाणा साधला आहे.
“ऐक्याच्या चर्चेसाठीदेखील जे पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत, ते आघाडीची मोट बांधण्याचे शंख फुंकतायत. स्वतंत्र चर्चेतही विसंवादाचेच सूर. कॉंग्रेसला पुन्हा डावललेच. किती ही मानहानी!”, असे ट्वीट करत केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच भाजपा हटविण्याच्या गमजा अनेकांनी मारल्या पण भाजपा वाढतच गेला कारण भाजपाची जनतेशी नाळ जोडली गेली आहे. असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला आहे.
ऐक्याच्या चर्चेसाठीदेखील जे पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत, ते आघाडीची मोट बांधण्याचे शंख फुंकतायत. स्वतंत्र चर्चेतही विसंवादाचेच सूर. कॉंग्रेसला पुन्हा डावललेच. किती ही मानहानी!!
— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 21, 2022
दरम्यान के. चंद्रशेखर राव यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या भेटी नाकारल्याने राजकारणात अनेक चर्चा रंगत आहेत. मात्र यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “आम्ही हे कधीच नाही म्हणालो की, काँग्रेस शिवाय आघाडी बनवायची आहे. जेव्हा ममता बॅनर्जींनी असं सूतोवाच केलं होतं तेव्हा शिवसेना पहिला पक्ष होता ज्यांनी काँग्रेससोबतच नवी आघाडी बनली पाहिजे, असे म्हटले होते. तसेच चंद्रशेखर राव यांच्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता आहे.”
महत्वाच्या बातम्या:
- नारायण राणेंना केंद्राचा जोर का झटका! सिंधुदुर्गातील चिवला बीचवरील ‘नीलरत्न’ बंगल्यावर कारवाईचे आदेश
- IND vs WI: अर्धशतक झाल्यानंतर सूर्याचे सेलिब्रेशन व्हायरल!
- रुपाली चाकणकरांनी संजय राऊतांना फटकारले, म्हणाल्या, “ठराविक पातळी सोडून…”
- “साहाने वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक करायला नको होत्या” सौरव गांगुलीच्या भावाचे वक्तव्य
- ‘…तर आम्ही थेट काँग्रेस कार्यालयावर जाऊन धडक देऊ’ – आमदार मिहिर कोटेचा


