टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत. या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचाही समावेश आहे. या यात्रेतील जामखेड येथील सभेत अमोल कोल्हे यांनी भाजपवर टीका केली आहे.
जामखेड येथील सभेला संबोधित करताना कोल्हे यांनी ‘राज्यात राष्ट्रवादीचा झंझावात असा येणार आहे की, कमळाची पाकळीही शिल्लक राहणार नाही असं विधान कोल्हे यांनी केले आहे. तसेच उमदं नेतृत्व जामखेडमध्ये उदयाला येत आहे. एक महत्वाचं इथे घडलं आहे. ते म्हणजे दोघेजण आमनेसामने येण्याची पहिली वेळ, या जामखेडच्या यात्रेच्या माध्यमातून घडली आहे असेही अमोल कोल्हे म्हणाले.
पुढे बोलताना अमोल कोल्हे यांनी ‘खबरदार मशीनमध्ये घोटाळा केला तर हीच तरुणाई रस्त्यावर उतरुन पळता भुई थोडी करेल हे लक्षात ठेवा असा इशारा देतानाचं असूदे मशीन, घाबरून जाऊ नका, घ्या छत्रपतींचे नाव आणि करा परिवर्तन, असा आत्मविश्वास डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेच्या मनात निर्माण केला.
दरम्यान, शिवस्वराज्य यात्रेतील जामखेड येथील सभेत तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवानेते रोहित पवार, मेहबूब शेख, रुपाली चाकणकर यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित होते.
- अरे बापरे! ‘आता शाळेच्या मतदानासाठी होतोय ईव्हीएमचा वापर’
- आम्ही पोलिओचे डोस नसते पाजले तर तुम्ही वेडेवाकडे जन्माला आला असता : चाकणकर
- ‘या सरकारने महाराजांच्या नावाखाली कर्जमाफीची घोषणा केली आणि शेतकऱ्यांना फसवले’
- औरंगाबादः शिवसेनेची 27 ऑगस्टला विश्वविक्रमी कावड यात्रा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

