औरंगाबाद : मनसे कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांचा बंगल्याचे नळ कनेक्शन कापल्याने शहरातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. शहरवासियांना काही ठिकाणी पाच तर काही ठिकाणी सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र मनपा आयुक्तांना चोवीस तास पाणी उपलब्ध असते. त्यामुळे त्यांना पाण्याचे महत्त्व नाही. नागरिकांप्रमाणेच मनपा आयुक्तांनाही पाच ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जावा अशी मागणी समस्त नागरिकांमधून होत आहे.
जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजना आता जुन्या झाल्या आहेत. त्या तुलनेत दररोज शहरातील पाण्याची मागणी वाढत चालली आहे गेल्या काही वर्षांपासून औरंगाबादकरांना पाणीटंचाईचा प्रचंड सामना करावा लागत आहे. जुन्या शहरातील गुलमंडी, सिटी चौक, शहागंज भागात तसेच अनेक वसाहतींमध्ये पाच ते सहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्याच वेळा काही वसाहतींमध्ये तीन ते चार दिवसांतून एकदा पाणी मिळते. आठवड्यातून किमान दोनदा पाणी मिळावे एवढीच रास्त अपेक्षा नागरिकांनी केली आहे.
मात्र कधी पाईपलाईन फुटल्याने तर कधी अंतर्गत तक्रारीमुळे सात ते आठ दिवस उलटूनही पाणी मिळत नसल्याने नागरिकांची पंचाईत होत आहे. त्या तुलनेत महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना चोवीस तास पाणी पुरवठा केला जातो. त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी तीन वेगवेगळे नळ कनेक्शन आहेत. शहरवासीय पाणीटंचाईचे संकट झेलत असताना आयुक्तांना चोवीस तास पाणी मिळत असल्याने त्यांना आमच्या समस्या कशा कळतील असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आमच्याप्रमाणेच आयुक्तांनाही पाच ते सात दिवसांआड पाणी देण्यात यावे तेव्हा त्यांना सामान्य नागरिकांच्या वेदना कळतील अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, भाजपची मुंबई आयुक्तांकडे मागणी
- ‘आमची मुंबई’चे ढोल बडवणारे सेलेब्रिटी आता कोणत्या बिळात लपले?’
- रेल्वेची धडक तिकीट तपासणी मोहीम, पाचच दिवसात १२८५ फुकट्यांवर कारवाई!
- दुर्दैवी घटना : ठाण्यात दरड कोसळून ३ वर्षांच्या चिमुरडीसह ५ जण ठार
- ग्रामीण भागात शाळा सुरु मात्र अजूनही शिक्षकांचे लसीकरण नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
