Share

‘आमची मुंबई’चे ढोल बडवणारे सेलेब्रिटी आता कोणत्या बिळात लपले?’

Published On: 

मुंबई : सध्या मुंबईत जोरदार पाऊस होत आहे. मुंबईतील अनेक ठिकाण जलमय झाले आहेत. वीजपुरवठा देखील काही वेळ खंडित करण्यात आला होता. काही ठिकाणची रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली होती. जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र सध्या मुंबईत बघायला मिळत आहे. या परिस्थितीवर अद्यापही कुठल्याच सिनेअभिनेता, अभिनेत्री, सेलेब्रेटी यांनी कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाहीये. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी सिलेब्रेटींवर टीका केली आहे.

त्यांनी म्हंटले की, मुंबईत एवढा मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे आणि मुंबई पालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे शहरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी कोणत्याच सेलिब्रेटिंनी साधी एक पोस्ट देखील केली नाही. अगोदर मुंबईचे कौतूक करत होते ते त्यांच्या स्क्रिप्टचा भाग होता की त्यासाठी त्यांना पैसे मिळायचे? आमची मुंबई म्हणत प्रेम दाखवणारे सेलिब्रेटी सध्या कोठे आहेत असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

दरम्यान, मुंबईतील सध्यस्थिती पावसामुळे बिकट झाली आहे. अनेक दुर्घटना देखील मुंबई व भोवतीच्या परिसारत घडल्या आहे. मुंबईतील चेंबूर व विक्रोळी येथे मुसळधार पावसामुळे भिंत व घरं कोसळल्याने अनेक नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला. हवामान विभागाने पुढील ४ ते ५ दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरीत्या घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!