औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाद्वारे विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली जाते. त्याअंतर्गत आता पुन्हा धडक तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली असून पाचच दिवसात १२८५ विनातिकिट प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून जवळपास ६ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड विभागाचे जय पाटील यांनी दिनांक १० जुलै ते १५ जुलै दरम्यान नांदेड रेल्वे विभागात धडक तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली. त्यांच्या सोबत इतर तिकीट तपासनीस आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे अधिकारी आणि जवानही सहभागी होऊन कारवाई करत आहेत. वारंवार दक्षिण मध्य रेल्वे विभागाने वारंवार विमातिकिट प्रवास करु नका अशा सूचना दिलेल्या असताना प्रवासी त्याकडे पाठ फिरवतात. याचा मोठा फटका रेल्वे विभागाला बसतो.
त्यामुळे अशा फुकट्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हि मोहिम हाती घेतली आहे. यापुढेही विमातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच धडा शिकवणार आहे. या तिकीट तपासणी मोहिमेत नांदेड ते मुदखेड, नांदेड ते आदिलाबाद, नांदेड ते मनमाड, नांदेड ते अकोला अशा विविध भागात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. यात तब्बल १ हजार २८५ विनातिकीट प्रवाशी आढळून आले. तसेच अनियमित प्रवास करणे आणि परवानगी शिवाय जास्त सामान घेवून जाण्यामुळे काही प्रवाशांवर कार्यवाही करण्यात आली. या अनियमित आणि विनातिकीट प्रवाशांकडून ६ लाख १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- सावधान ! पुण्यासह ‘या’ नऊ जिल्ह्यांना पाऊस झोडणार; रेड अलर्ट जारी
- शिवसेनासोबत असल्यानेच माझे केस उडाले, आता फडणवीस सांगतील तसं आपण धावायचं – चंद्रकांत पाटील
- रस्त्यावर पडलेला कचरा दिसल्यास रेड्डीला पहिल्या दिवशी हजार तर दुसऱ्या दिवशी होणार दोन हजारांचा दंड!
- ‘छगन भुजबळांनी बिंदू चौकात येऊन फडणवीसांशी चर्चा करावी म्हणजे…; चंद्रकांत पाटलांच खुलं आव्हान
- ‘ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला त्याच पाळतखोर मंडळींचा हा आकांडतांडव’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

