Share

संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, भाजपची मुंबई आयुक्तांकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दरवर्षी पडणारा पाऊस मुंबईची ‘तुंबई’ करतो. असे असताना देखील मुंबई महानगर पालिकेला अद्याप त्याचे नियोजन करता आलेले नाही. मुंबई प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दुर्घटना होत आहेत. रविवारी झालेल्या पावसामुळे देखील मुंबईत ३० नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणात मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच अशा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

या संदर्भामध्ये प्रसाद लाड यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी मनपा आयुक्तांना या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात ते म्हणाले की, ‘मुंबईत दरवर्षी कोसळणाऱ्या पावसाचा अंदाज असताना देखील प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असून यापुढे अशा दुर्दैवी घटना घडू नयेत.’

मुंबई महानगर पालिका पावसाळ्यापूर्वी सर्व कामे झाली असल्याचा दावा करत होती. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही लक्ष होते. असे असताना मुंबईतील पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्वांमुळे भाजपच्या वतीने शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!