मुंबई : मुंबई आणि उपनगरात परवा रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व इथं डोंगर परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले आहे.
यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले, तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे. चेंबूरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना ताजी असताना अगदी तशाच घटनेची पुनरावृत्ती ठाण्याच्या कळवा शहरात झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरावर दरड कोसळल्याने अचानक मोठा आवाज आला.
हा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घराबाहेर आले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. एका घरावर दरड कोसळल्याने ते घर नेस्ताबूत झाले आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. मदतकार्य युद्धापातळीवर सुरू आहे.
दरम्यान पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून अनेक भागांतील वाहतूक विस्कळित झाली आहे. सीएसटीएम वरुन जाणाऱ्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून कल्याण-मुंबई लोकल सेवाही ठप्प झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सावधान ! पुण्यासह ‘या’ नऊ जिल्ह्यांना पाऊस झोडणार; रेड अलर्ट जारी
- शिवसेनासोबत असल्यानेच माझे केस उडाले, आता फडणवीस सांगतील तसं आपण धावायचं – चंद्रकांत पाटील
- रस्त्यावर पडलेला कचरा दिसल्यास रेड्डीला पहिल्या दिवशी हजार तर दुसऱ्या दिवशी होणार दोन हजारांचा दंड!
- ‘छगन भुजबळांनी बिंदू चौकात येऊन फडणवीसांशी चर्चा करावी म्हणजे…; चंद्रकांत पाटलांच खुलं आव्हान
- ‘ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला त्याच पाळतखोर मंडळींचा हा आकांडतांडव’


