औरंगाबाद : १५ जुलैपासून औरंगाबाद ग्रामीण भागात प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. मागील जवळपास वर्षभरापासून प्रत्यक्ष शाळा बंद होत्या व ऑनलाईन अभ्यास सुरू होता. शैक्षणिक नुकसान भरपाई करिता ग्रामीण भागात शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या आहे. यात महत्वाचा भाग म्हणजे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण शिबिर घेण्यात यावे. अशी मागणी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजून कोरोना पूर्णतः गेलेला नाही. त्यामुळे लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. विद्यार्थ्यांच्या थेट संपर्कात येणाऱ्या शिक्षक वर्गाचे लसीकरण अतिशय महत्त्वाचे आहे. ज्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे लसीकरण झाले नाही त्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी केंद्रनिहाय वेगळे कॅम्प घेण्यात यावे. पुर्णतः इयत्ता १ ते १२ वी पर्यंत शिक्षकांचे लसीकरण करून घ्यावे. अशी मागणी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजीव जाधवर यांना निवेदन देऊन करण्यात आली.
शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय ७ जुलै २०२१ प्रमाणे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणासाठी प्राधान्याने नियोजन करून सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. अशी विनंती करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांना देखील निवेदन देण्यात आले. यावेळी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा मेयार अससोसिएशन चे मराठवाडा अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, राज्य उपाध्यक्ष शफीक पठाण, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद ताजींमोद्दीन आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- सावधान ! पुण्यासह ‘या’ नऊ जिल्ह्यांना पाऊस झोडणार; रेड अलर्ट जारी
- शिवसेनासोबत असल्यानेच माझे केस उडाले, आता फडणवीस सांगतील तसं आपण धावायचं – चंद्रकांत पाटील
- रस्त्यावर पडलेला कचरा दिसल्यास रेड्डीला पहिल्या दिवशी हजार तर दुसऱ्या दिवशी होणार दोन हजारांचा दंड!
- ‘छगन भुजबळांनी बिंदू चौकात येऊन फडणवीसांशी चर्चा करावी म्हणजे…; चंद्रकांत पाटलांच खुलं आव्हान
- ‘ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला त्याच पाळतखोर मंडळींचा हा आकांडतांडव’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

