बीड : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मजूर संस्था व अभियंता यांच्या माध्यमातून २० लाख रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरलेले सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भतानेंसह सहा अधिकाऱ्यांवर येथील तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या तक्रारीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेची कृषी खात्याच्या दक्षता पथकाकडून दोन वेळेस चौकशी केली होती. यात १३८ मजूर संस्था तसेच २९ गुत्तेदार व अभियंता, २८ अधिकारी यांच्यावर एफआयआर दाखल करून निलंबनाची कारवाई झाली. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांच्यासह इतर ५ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊनही गुन्हे दाखल केले जात नव्हते. त्यामुळे परळी येथील काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
दरम्यान, वसंत मुंडेंनी उपलोकआयुक्त कार्यालयात १४ ऑक्टोबर २०२० ला ऑनलाइन सुनावणीद्वारे विभागीय कृषी सहसंचालक व पूर्वीचे जिल्हा कृषी अधीक्षक सेवानिवृत्त रमेश भतानेंसह उपविभागीय कृषी अधिकारी विष्णू मिसाळ व प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या काळात बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची नियमबाह्य बोगस कामे दाखवून बिले उचलल्याबाबत तक्रार केली होती. परळी विधानसभा मतदारसंघअंतर्गत योजनेमधील दोन्ही टप्प्यातील चौकशीत ८ कोटी ३६ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले. त्यामध्ये ५० टक्के गुत्तेदार व ५० टक्के अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश दिले होते.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी आक्रोश मोर्चाला बीडपासून सुरुवात
- म्यूकरमायकोसिसचे औषधे अल्पदरात द्या; खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश
- गेवराईत नियमांचे उल्लंघन करणारे चार दुकाने सील
- सावधान! रक्त तपासणीच्या नावाखाली कोरोना रुग्णांची लूट सुरू
- रात्रीस खेळ चाले! परतूरमध्ये रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
