नांदेड : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानिमीत्त संचखंड बोर्डाचे अध्यक्ष भुपिंदरसिंह मनहास यांनी सचखंड पब्लिक स्कुल तसेच क्रीडांगणासाठी १०० कोटी रुपयांची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.
शिख धर्मियांचे ९ वे गुरु श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या १ मे रोजी ४०० वे प्रकाशपर्व राष्ट्रीय स्तरावर चतुर्थ शताब्दी म्हणून साजरा करण्यात येणार आहे. श्री गुरु तेग बहादूर साबिह यांनी बलिदान तसेत शर्मा रक्षणासाठी त्यांनी बलिदान दिले होते. त्यामुळे या गोष्टी नवीन पिढीला समजाव्यात तसेच त्या स्मरणात राहाव्यात. यातून त्यांना प्रेरणा देखील मिळावी, हा या मागचा हेतू आहे त्यामुळे गुरु तेग बहादूर साहिब यांच्या नावाने भव्य दिव्य अशी वास्तू निर्माण व्हावी, या करिता पब्लिक स्कुलच्या इमारतीकरिता तसेच क्रीडांगणाची निर्मिती देखील करण्याचे ठरवण्यात आले आहे.
या मुळे क्रीडांगणामध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कुस्तीसह अनेक खेळांचे उच्च दर्जाचे क्रीडागंण, उत्तम प्रशिक्षक यांची नेमणुक देखील करण्याचे ठरवले आहे. येथील राष्ट्रीय पातळीवर खेळाडू तयार करण्याचे काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. हे सर्व करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या बाबत पत्र देखील पाठवलेले आहे. तसेच या मध्ये १०० कोटी रुपयांची मागणी देखील करण्यात आली असल्याचे या वेळी गुरुव्दारा सचखंड बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदर सिंह मनहास यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मृत्यूनंतरही यातना संपेना! अंत्यविधीच्या प्रक्रियेत नातेवाईकांची फरफट
- १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, जाणून घ्या लस घेण्याची प्रक्रिया
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी
- ‘नवाब मलिकांनी आता तरी तोंड काळे करावे’, भाजपच्या अतुल भातकळकरांचे आव्हान
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

