मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी भारताचा किपर आणि बॅट्समन ऋषभ पंतला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. रिषभ पंत याने भारतीय संघासाठी महत्वपूर्ण शतक बनवत भारताचा डाव सावरला आहे. वॉशींग्टन सुंदर आणि रिषभ पंत यांच्या भागिदारीने भारताने इंग्लंडवर आघाडी मिळवली आहे. रिषभ पंत याने दमदार षटकार ठोकून शतक केलं. यानंतर, उपस्थितांनी त्याला उभं राहून दाद देखील दिली. हे त्याच तिसरं कसोटी शतक ठरलं आहे. ११८ चेंडूंमध्ये १०१ धावा केल्यानंतर जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर रिषभ पंत झेलबाद झाला.
युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ हा भारतासाठी टी-२०त मॅचविनर बनू शकतो. आगामी टी-२० विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून त्याला अधिक संधी देण्याची गरज असल्याचे मत माजी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने व्यक्त केले आहे. इंग्लंडविरुद्ध आगामी पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी २३ वर्षांच्या पंतला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला मर्यादित षटकांच्या सामन्यात संधी मिळाली नव्हती. पंतने कसोटी सामन्यात शानदार कामगिरी केली. मालिका विजयात त्याचे योगदान निर्णायक ठरले. अहमदाबादच्या चौथ्या कसोटीत पंतने शतक ठोकले होते.
स्टार स्पोर्ट्सच्या ‘गेम प्लान’ या कार्यक्रमात बोलताना लक्ष्मण म्हणाला,’आम्ही पंतला दिल्ली कॅपिटल्सकडून दडपणात खेळून सामना जिंकताना पाहिले आहे. डावखुरा फलंदाज या नात्याने तो पर्याय सुचवितो. तो स्थिरावल्यास प्रतिस्पर्धी कर्णधार अडचणीत येतो. त्याचा आगामी मालिकेत समावेश करणे योग्य निर्णय आहे. एक दोन सामने खेळवून त्याच्या कामगिरीचे आकलन करू नका. विश्वचषक लक्षात ठेवून त्याला खेळवा. एकदा त्याला संघात स्थिरावण्याची खात्री लाभली तर तो एकट्याच्या बळावर सामना जिंकून देऊ शकतो.’
महत्वाच्या बातम्या
- ‘दिल्लीश्वरांना कदाचित दैवी शक्ती प्राप्त झाल्यने ‘कोरोना’ त्यांना स्पर्श करीत नसेल’
- सासऱ्यांच्या ट्विटला जावयाचा भन्नाट रिप्लाय ; सोशलवर ‘हे’ ट्विट ट्रेंड
- पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा देणाऱ्यांसाठी आजपासून ‘मॉक टेस्ट’
- आयसीसी पुरस्कारातही भारताची इंग्लडवर मात; भारतीय खेळाडु सलग दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट
- घाटीतील प्रथम ते चतुर्थ श्रेणीतील मंजूर पदे भरण्याची कार्यवाही लवकरच भरणार; देशमुख

