टीम महाराष्ट्र देशा : प्रेमाचं प्रतीक असलेल्या ताजमहालच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं ताजमहालाच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला फटकारलं आहे. ताजमहालची योग्य निगा राखता येत नसल्यास तो बंद तरी करा, अन्यथा पाडून टाका, असं बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे.ताजमहलच्या डागडुजीबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने आपले मत व्यक्त केले.
Supreme Court told Centre and the state government that either you preserve the Taj Mahal, or close it or destroy it. https://t.co/FJ1nIaWrzA
— ANI (@ANI) July 11, 2018
ताजमहलच्या संरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या उदासिन धोरणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. मोगलकालीन या ऐतिहासिक इमारतीच्या संरक्षणाबाबत कोणती भूमिका घेतल्याचे दिसत नाही. एकतर आम्ही ताजमहल बंद करू किंवा तुम्ही तर तो उद्धवस्त करून टाका, अशा कठोर शब्दांत त्यांनी केंद्र व राज्य सरकारला सुनावले. आयफल टॉवरपेक्षाही सुंदर ताजमहल आपल्या देशात आहे. यामुळे देशातील विदेशी चलनाची समस्याही दूर होऊ शकते, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री-संत्री आले गेले – राजू शेट्टी.
मुंबईच्या महापौरांचा अजब दावा म्हणे यंदा ‘मुंबईत पाणी तुंबलंच नाही !’


