Share

चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री-संत्री आले गेले – राजू शेट्टी.

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री-संत्री आले गेले मी ४ मुख्यमंत्र्यांबरोबर संघर्ष केलाय, त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही अशी जोरदार टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना चंद्रकांत पाटलांवर केलीय. त्याचबरोबर मुंबईला दुधाचा एक थेंबही पुरवठा होऊ देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

राजू शेट्टी आज परभणीत होते. या दरम्यान त्यांनी मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पीक विमा आंदोलनकांची भेट घेऊन हा विषय दिल्लीच्या अधिवेशनात मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितल. दूध आंदोलनावरून चंद्रकांत पाटलांवर त्यांनी जोरदार ताशेरे ओढले.

चंद्रकांत पाटलांच्या आज्ञेत भर टाकतो. ११ वर्षांपूर्वी जुलै २००७ मध्ये माझ्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात दूध बंद आंदोलन झालं होतं आणि ते यशस्वीही केलं होतं. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यांनी अमेरिकेतून फोन करून मला आंदोलन मागे घेण्यास विनंती केली होती. चंद्रकांत पाटील हे आत्ताच राजकारणात आले आहेत. त्यामुळे त्यांचा इतिहास कच्चा आहे, त्यांच्या सारखे अनेक मंत्री मी पचवले आहेत असा टोला राजू शेट्टींनी लगावला.

तसेच राज्यातील शेतकऱ्यांकडून कोण ठेकेदारी घेतं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अधिक काही बोलायला लागले तर मला बरंच काही बाहेर काढताय येईल असंही राजू शेट्टी म्हणाले.तसेच दूध बंद आंदोलन शंभर टक्के होणारच. हा महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांनी निर्णय घेतला असून जर कुणी जबरदस्ती केली तर जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही राजू शेट्टींनी दिला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!