Share

IPL मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना देखील संधी द्या ; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंना देखील दिलं अनोखं निमंत्रण!

Published On: 

दुबई : आयपीएलचे विजेतेपद मिळविण्यासाठी आता चार संघांचं स्थान निश्चित झालं असून ते जोर लावताना दिसत आहेत. आयपीएल प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवणायसाठी मुंबई इंडियन्स वगळता इतर संघांना यंदा चांगलाच संघर्ष करावा लागला.

काल आयपीएलची अंतिम साखळी सामना होता. आता प्ले ऑफला सुरुवात होणार असून कालच्या अंतिम सामन्यांमध्ये कोलकाताच्या अशा मात्र संपुष्टात आल्या आहेत. आयपीएल २०२० च्या जेतेपदासाठी आता मुंबई, दिल्ली, बँगलोर आणि हैद्राबाद यांच्यात लढत रंगणार असतानाच पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने आयपीएलच्या पुढील सत्रासाठी महत्वाची मागणी केली आहे.

“आयपीएल खेळता येत नसल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचं मोठं नुकसान होत आहे. “मला असं वाटतं की, आयपीएलला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे. राजकारण हा दोन्ही देशांच्या सरकारचा मुद्दा आहे. त्यांच्यामुळे दोन्ही देशातील खेळाडू क्रिकेट खेळू शकत नाहीत. आयपीएल ही सर्वात यशस्वी क्रिकेट लीग आहे. मला या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंना खेळताना पाहायचं आहे.” अशी इच्छा वसीम अक्रमने व्यक्त केली आहे.

2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. तेव्हापासून पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमधून बॅन करण्यात आलं आहे. तर, वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंना पाकिस्तानी लीगमध्ये देखील खेळण्याचं निमंत्रण दिलं आहे.

‘मला भारतीय खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीगमध्येदेखील पाहायचं आहे. जर भारतीय खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळू लागले तर अजून मजा येईल.’ असं देखील वसीम अक्रम म्हणाला असून सद्या क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!