कोझिकोड : केरळ मध्ये दर ५ वर्षांनी लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंट आणि काँग्रेस प्रणित यु डी एफ यांना सत्ता मिळत आली आहे. मात्र या प्रदीर्घ काळात काँग्रेस किंवा एलडीएफ ने केरळचा रस्ते विकास, आर्थिक विकास, मूलभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर असा कोणताही विकास केला नाही.
रोजगाराची केरळ मध्ये संधी नसल्याने केरळ मधील तरुण दुबई, यूएई, युरोप आदी ठिकणी परदेशात रोजगारासाठी गेले आहेत. त्यामुळे केरळच्या विकासासाठी एलडीएफ आणि युडीएफला नाकारून जनतेने भाजप प्रणित नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स एनडीएला केरळ मध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी द्यावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले.
भाजपचे केरळ राज्य सरचिटणीस एम पी रमेश कोझिकोड(कालिकत) उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या प्रचार सभेत रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. केरळमध्ये सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाने भाजपला पाठिंबा दिला आहे.
केरळच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एल डी एफ; काँग्रेस प्रणित युडीएफ आणि भाजप प्रणित एनडीए असा तिहेरी मुकाबला होत आहे. त्यामुळे भाजपला अधिक बळ देण्यासाठी आरपीआयने एक ही उमेदवार निवडणुकीत न उतरवता सर्व जागांवर भाजप प्रणित एनडीए ला पाठिंबा दिला आहे.
त्यामुळे या निवडणुकीत भाजप ला केरळ मध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी नक्की मिळणार असून सत्ता आल्यास केरळ मध्ये रिपाइंला ही सत्तेत सहभाग मिळेल असा विश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांप्रमाणेच महात्मा आयांकाली आणि नारायण गुरू या महान समाज सुधारकांच्या विचारांनुसार केरळ मध्ये रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू आहे. केरळ मधील २५ टक्के दलित आदिवासिंच्या विकासासाठी भाजप प्रणित एनडीएचे सरकार केरळ मध्ये निवडून देणे आवश्यक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतात एनडीए सर्व समाज घटकांना न्याय देऊन विकास साधत आहे.केरळच्या विकासासाठी जनतेने भाजप प्रणित एनडीए च्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. यावेळी रिपाइं चे राजीव मेनन, नुसरत जहाँ, रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष विजय राजन आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईत केरळचे मल्याळम भाषिक नागरिक लाखोंच्या संख्येने राहत असून त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष नेहमी खंबीरपणे उभा राहिला आहे असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- आम्ही इटालियन जोडे उचलणार, पण तुम्ही दिल्लीकडे बघायचं नाही; भाजप नेत्याने राऊतांना झापलं
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- पवारांनी अनेकवेळा शारीरिक संकटावर मात करून महाराष्ट्राला पुढे नेलय; आव्हाडांची भावुक पोस्ट
- पवार साहेब-शाहांची भेट झाली नाही, ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे – जितेंद्र आव्हाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

