🕒 1 min read
औरंगाबाद : लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या नामकरणाचा शासन आदेश त्वरीत निर्गमित करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. आ.सतीश चव्हाण यांनी मंगळवारी (दि.२२) मंत्रालयात कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक यांसह विविध क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा विचार करता लातूर येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे नामकरण विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय असे करण्यास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद तसेच राज्याच्या कृषी परिषदेने २०१३ मध्ये ठराव घेऊन त्यास मान्यता देखील दिली.
कृषी परिषदेने या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी शासनाकडे शिफारस केली आहे. परंतु हा प्रस्ताव ७-८ वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित असून यासंदर्भात अद्यापही शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नसल्याचे चव्हाण यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून दिले. या महाविद्यालयाचे नामकरण विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय असे करण्यास मान्यता देऊन त्वरीत शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली. कृषी मंत्री दादा भुसे यांनी देखील यासंदर्भात त्वरीत कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईत रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडले; आशिष शेलारांनी केली शिवसेनेवर खोचक टीका
- ‘बावनकुळेंनी मंत्री असताना इतका भ्रष्टाचार केला की भाजपने तिकिटच दिले नाही’
- ‘आता अँटीबॉडीज लोड होत आहेत’; कोरोनाची लस घेतल्यानंतर कार्तिकने शेअर केला फोटो
- राजीव सातव यांच्या जागी पृथ्वीराज चव्हाणांना दिली जाणार संधी ?
- लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढावल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
