औरंगाबाद : मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना मराठा कुणबी पत्र देण्याची मागणी मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी केली. यावेळी समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
१ मे १९६० रोजी मराठवाडा विनाअट संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला. निजामाचे राज्य असताना कुणबी मराठा म्हणून समाजाची नोंद होती. महाराष्ट्रात समाजाचा कागदोपत्री चुकीने उल्लेख मराठा झाला. त्यामुळे इतर मागासवर्गीयांना मिळणाऱ्या सोयी सवलती पासून मराठा समाजाला वंचित राहावे लागले आहे.
तसेच १९०१ रोजीच्या जनगणनेनुसार मराठवाड्यात मराठा कुणबी असा उल्लेख असून मराठा जातीचा उल्लेख नाही. त्यानंतर १९०९ च्या हैद्राबाद गॅझेटनुसारही मराठवाड्यात मराठा कुणबी असाच उल्लेख आहे. तसेच २००४ च्या न्या. खत्री आयोगाने इतर मागासवर्गीयांच्या यादीत अनुक्रमांक ८३ मध्ये मराठा कुणबीचा समावेश केला आहे. मराठवाड्यातील ज्यांचा चुकीने कागदोपत्री उल्लेख मराठा झाला आहे, ते मुळ कुणबी असल्याचे प्रदीप सोळुंके यांनी निवेदनात नमूद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- #HBD : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री ‘सई ताम्हणकरला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा…
- कर्णधार कोहलीचा ‘बेस्ट ऑफ थ्री’ला पाठिंबा, म्हणाला…
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

