🕒 1 min read
औरंगाबाद : ‘स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर बाबासाहेब मनोहरे यांना बसूच देणार नाही. आजच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना औरंगाबाद स्मार्ट सिटीस आयएएस दर्जाचा अधिकारी द्यावा अशी मागणी केली आहे’, अशी माहिती शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला दिली.
नगर विकास विभागाने १ फेब्रुवारी रोजी स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली. त्यानूसार नगरविकास मंत्रालयाकडून मिळालेल्या तातडीच्या सूचनांनुसार ते गुरुवारी (दि.१८) औरंगाबादेत दाखल झाले. सोमवारी (दि.२२) स्मार्ट सिटी सीईओ पदाचा कार्यभार ते स्वीकारणार आहेत. मात्र त्यांना या पदावर बसण्याचा काहीच अधिकार नसल्याचे खैरे यांनी सांगितले.
खैरे म्हणाले की, औरंगाबाद शहराची देशातल्या काही मोजक्याच शहरांपैकी स्मार्ट सिटी या प्रकल्पासाठी निवड झालेली आहे. स्मार्ट सिटीतील सध्या जवळपास ७८० कोटी रुपयांची विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय हे स्मार्ट सिटी डेव्हपमेंट कॉर्पोरेशेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून योग्य नियोजन करत आहेत. त्यामुळे बाबासाहेब मनोहरे यांच्या या निवडीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
मात्र, शासन नियमानुसार मनपा आयुक्त आणि स्मार्ट सिटी डेव्हपमेंट कॉर्पोरेशेन सीईओ पदावर एकच व्यक्ती असू शकत नाही. तर मनोहरे हे आयएएस दर्जाचे अधिकारी नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने त्यांची ही शिफारस रद्द करावी, अशी मागणी आजच केल्याचे खैरे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘स्मार्ट’पद आपल्याकडेच राहणार! पांडेय यांना ‘कॉन्फिडन्स’
- कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
- सातारा-देवळाई कोरोना हॉटस्पॉट?
- ‘तेंव्हा जर तुम्ही आमच्याशी ‘लव्ह मॅरेज’ केले असते, तर आज राज्यात युतीचीच सत्ता राहिली असती’
- ‘भविष्यात युतीची सत्ता पुन्हा येऊ शकते, भविष्याचं काही सांगता येत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
