Share

‘स्मार्ट’पद आपल्याकडेच राहणार! पांडेय यांना ‘कॉन्फिडन्स’

Published On: 

औरंगाबाद : सोमवारी (दि.२२) बाबासाहेब मनोहरे स्मार्ट सिटी सीईओ पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. मात्र अजूनही स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या विविध कामात प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय व्यस्त असल्याचे दिसून येते. आज खाम नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमात आपल्याला खाम नदी पूर्णपणे स्वच्छ करायची आहे असे आवाहन पांडेय यांनी केले. यावरून स्मार्ट सिटीचे सीइओपद आपल्याकडेच राहणार असल्याची त्यांना खात्री असल्याचे दिसून येते.

आज (दि.२०) पर्यंत प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय स्मार्ट सिटीच्या विविध कामांमध्ये रस घेत असल्याने येत्या काळात हा वाद पेटण्याची शक्यता आहे. नगर विकास विभागाने काही दिवसांपूर्वी अचानक स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली. या नियुक्तीला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्थगिती दिलेली असतानाही मनोहरे यांनी सोमवारी सीईओपदी रुजू होणार असल्याचे ‘महाराष्ट्र देशा’ला सांगितले.

मात्र पांडेय यांचे या पदासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मनोहरे यांच्या या नियुक्तीमुळे पाण्डेय यांना धक्का बसला आहे. आगामी काही वर्षांमध्ये स्मार्ट सिटीच्या विविध विकासकामांचे नियोजन त्यांनी केले होते. चांगले काम सुरू असताना थेट आयएएस अधिकारी नसलेले मनोहरे यांची नियुक्ती कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आजच्या खाम नदीच्या कार्यक्रमात आगामी १५ मेपर्यंत खाम नदी पूर्णपणे स्वच्छ होईल, असा विश्‍वास पांडेय यांनी व्यक्‍त करत संपूर्ण टीमला लोकसहभागातून या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!