जळगाव : भविष्यात युतीची सत्ता पुन्हा येऊ शकते, भविष्याचं काही सांगता येत नाही, असे संकेत भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर दिलेत.
महापालिकेच्या वतीने आज दुपारी केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात महाजन व गुलाबराव पाटील दोघे नेते एकाच व्यासपीठावर होते. यावेळी दोघांनी आपल्या भाषणात एकमेकांना राजकीय चिमटे काढले.
‘पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसचे लोकार्पण होत आहे. या परिसरात शिवसेनेचे अवघे तीन नगरसेवक आहेत. महापालिकेत आमचे संख्याबळ जास्त आहे. पण आम्ही दुजाभाव केला नाही. हे राज्यात आदर्श ठरणारे उदाहरण आहे. पण राज्यात असे घडले नाही.
आमच्या मतदारसंघाचे पैसे तुम्ही पळवले. सत्ता आपली आहे, काल तुमची सत्ता होती. उद्या आमची सत्ता असेल, काही सांगता येत नाही. उद्या-परवा आपली सत्ता असेल. आज तर मला याठिकाणी युतीची सत्ता आहे, असेच वाटतेय. भविष्यात काय घडेल, हे सांगता येत नाही’, असंही गिरीश महाजन यांनी म्हंटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- बेकायदेशीर दारू विकणाऱ्या पाच जणांवर कारवाई
- बीडमधील ‘सन्मान’च्या २८ हजार बोगस लाभार्थींकडून १९ कोटींची वसुली होणार
- ऐकावे ते नवलंच! एका उंदरामुळे महापालिका बेजार
- आठ दिवसांपूर्वी कोरोना लस घेतलेल्या पोलिसाचा मृत्यू
- सोयाबीनच्या ओलावा तपासणी यंत्रातच हेराफेरी ; विभागीय आयुक्तांपर्यंत तक्रार


