परभणी : शहरातील एका खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा शुक्रवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सय्यद मोईन अली सय्यद यासीन अली (50) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सय्यद मोईन अली सय्यद यासीन अली हे पुर्णा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. यांना 1 फेब्रुवारीला येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर 5 फेब्रुवारीला आरटीपीसीआरच्या केलेल्या चाचणीतून ते कोरोनाबाधित असल्याचे आढळले होते. त्यांना लगेचच शहरातील दुसऱ्या खासगी रुग्णालयात त्यांना हलवले. त्यांच्यावर उपचारादरम्यान श्वास घ्यावयास त्रास सुरु झाला. त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादकडे नेत असताना त्यांचे निधन झाले. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याने गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र वावरताना नागरिक सुरक्षित सामाजिक अंतराचे पालन न करणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, तोंडावर मास्क न लावता फिरत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना संसर्गात होणारी वाढ पाहता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे नमूद करीत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १५ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद ठेवावेत, असे आदेश दिलेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘स्मार्ट’पद आपल्याकडेच राहणार! पांडेय यांना ‘कॉन्फिडन्स’
- पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले ‘अग्निपंख’
- शिवसेना राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देते : आमदार अंबादास दानवे
- बेकायदेशीर दारू विकणाऱ्या पाच जणांवर कारवाई
- परभणी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार १५ मार्चपर्यंत बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

