औरंगाबाद : शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. विशेष म्हणजे यात सातारा-देवळाई भागात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. एकच कुटुंबातील चार ते पाच व्यक्ती पॉझिटिव्ह निघत असल्याने या भागात आरोग्य पथकाकडून तपासणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. कोरोनाचा उद्रेक होत असल्याने हा भाग येत्या काळात कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन पालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहे. बाहेरगावाहून बस व रेल्वेने येणार्या प्रवाशांच्या तपासणीसाठी रेल्वेस्टेशनबरोबरच आता मध्यवर्ती बसस्थानकातही पथके तैनात केली आहे. हे पथक सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी कार्यरत राहणार आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार पालिकेने उपाययोजना अधिक कडकपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रारंभी कोरोना लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स कोरोना लस घेण्यासाठी तयार होत नव्हते. मात्र कोरोना संसर्ग वाढल्याचे पाहताच लसीकरणास प्रतिसाद वाढला आहे. आज पोलीस आयुक्त निखील गुप्ता, ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी लस घेतली. कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला तर त्याच्या संपर्कातील १९ व्यक्तींची आरटीपीसीआर पद्धतीने कोरोना चाचणी केली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘स्मार्ट’पद आपल्याकडेच राहणार! पांडेय यांना ‘कॉन्फिडन्स’
- पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले ‘अग्निपंख’
- शिवसेना राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देते : आमदार अंबादास दानवे
- बेकायदेशीर दारू विकणाऱ्या पाच जणांवर कारवाई
- परभणी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार १५ मार्चपर्यंत बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

