Share

‘तेंव्हा जर तुम्ही आमच्याशी ‘लव्ह मॅरेज’ केले असते, तर आज राज्यात युतीचीच सत्ता राहिली असती’

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : जळगाव महापालिकेच्या वतीने आज दुपारी केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन व शिवसेना नेते गुलाबराव पाटील दोघे नेते एकाच व्यासपीठावर होते. यावेळी दोघांनी आपल्या भाषणात एकमेकांना राजकीय चिमटे काढले.

भविष्यात युतीची सत्ता पुन्हा येऊ शकते, भविष्याचं काही सांगता येत नाही, असा चिमटा गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटील यांच्यासमोर काढला आहे. ‘आमच्या मतदारसंघाचे पैसे तुम्ही पळवले. सत्ता आपली आहे, काल तुमची सत्ता होती. उद्या आमची सत्ता असेल, काही सांगता येत नाही. उद्या-परवा आपली सत्ता असेल. आज तर मला याठिकाणी युतीची सत्ता आहे, असेच वाटतेय. भविष्यात काय घडेल, हे सांगता येत नाही’, असं गिरीश महाजन म्हणाले.

याला गुलाबराव पाटील यांच्याकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. ‘आज सत्ता आहे, पण उद्या कोणाची सत्ता येईल, हे सांगता येत नाही. गिरीश महाजन यांनी महापालिकेत कशी सत्ता आणली, हे मला चांगले माहिती आहे. त्यांनी जी रसद पुरवून सत्ता आणली ती रसद आमच्याकडे नव्हती.

त्यांनी राज्यात जे केले, तेच महापालिकेतही केले. तेव्हा जर तुम्ही आमच्याशी ‘लव्ह मॅरेज’ केले असते, राज्यात सरकार स्थापनेवेळी एक पाऊल पुढे टाकले असते, तर आज राज्यात युतीचीच सत्ता राहिली असती. पण ते आपल्या हातात नाही. वरचे लोक काय करतात, कार्यकर्ता म्हणून जो रोल आपल्याला दिला जातो, तो आपल्याला करावा लागतो, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी महाजनांसह भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!