🕒 1 min read
अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सनीच्या या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरलही होताना दिसतात. काही पोस्टमुळे सनीनं कौतुक होतं तर काही वेळा तिला सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं.
काही दिवसांपूर्वीच सनीला, ‘प्रसिद्धीसाठी मुलगी निशाला दत्तक घेतलं’ असं म्हणत तिला काही लोकांनी ट्रोल केलं होतं. त्यावर आता सनीनं ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी सनी लिओनीचा तिच्या मुलांसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ती तिच्या दोन्ही मुलांचा हात पकडला होता. मात्र मुलगी निशा एकटीच चालत होती. त्यामुळे सनीला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावर आता सनीनं मौन सोडलं आहे.
एका मुलाखतीत सनी म्हणाली, “मला वाटतं ज्या लोकांनी माझ्याबद्दल असं लिहिलं किंवा बोललं आहे ते माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग नाहीयेत. एका फोटो किंवा व्हिडीओ माझं पालकत्व कसं आहे किंवा मी कशी आहे हे सांगू शकत नाही. घरी राहून माझ्याबद्दल मत व्यक्त करण्यापेक्षा माझं आयुष्य ५ मिनिटांसाठी जगून पाहा.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
