नवी दिल्ली : सध्या युरोप खंडात युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO या लष्करी संघटनेमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे.
रशियाचे लष्कर हे जगातील सर्वात ताकदवान लष्करापैकी एक आहे. युक्रेनचे लष्कर हे रशियाच्या बलाढ्य लष्करासमोर अत्यंत दुबळे आहे. तरी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की हे एकट्याने खिंड लढवत आहेत. युक्रेनचे लष्कर हे बलाढ्य नसले तरी ते रशियाशी उत्तमरीत्या सामना करत आहे. २४ फेब्रुवारी रोजी रशियाच्या लष्कराने युक्रेनवर हल्ला करायला सुरुवात केली. रशियाच्या लष्कराला युक्रेनमध्ये लगेच यश मिळेल अश्या संभ्रमात व्लादिमीर पुतीन होते ; मात्र व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या खंबीर नेतृत्वामुळे रशियाला युक्रेनमध्ये म्हणावे तसे यश मिळताना दिसत नाहीये.
हाच राग मनात धरून व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना जीवे मारण्याचा तब्बल ३ वेळा प्रयन्त केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र या तिन्ही वेळा रशियाच्या गुप्तहेरांना अपयशच आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “नागराज तुझ्या आयुष्यातील ..” नागराज मंजुळेसाठी सुबोध भावेची खास पोस्ट
- विराटपूर्वी ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंनी गाठलंय कसोटी शतक! वाचा कोण आहेत ते
- साऊथ सुपरस्टार धनुष ‘झुंड’च्या प्रेमात पडला! म्हणाला,”नागराजचा आवाज…”
- ‘ओबीसी आरक्षणाला धक्का नाही तर धोका’ – हरिभाऊ राठोड
- रोहितने विराटवर उधळली स्तुतीसुमने म्हणाला मला त्याची…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

