जळगाव : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सध्या विसंगत असं हवामान असून यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनता देखील त्रस्त झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण भागात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजवला. तर, खान्देशात पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. जमिनीत ओल आलेली नाही. धरणे अद्याप कोरडी आहेत. दुष्काळ सदृश्य भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
या स्थितीवर बोलताना माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘महाविकास आघाडी सरकार मधील तिन्ही पक्ष श्रेयवादाच्या लढाईत राज्याचे नुकसान करत आहेत. शासनाच्या तिजोरीत ठणठणाट असून गेल्या दोन वर्षांत राज्यात कुठलीही ठोस कामे झालेली नाहीत. काही भागात पूरग्रस्त परिस्थिती तर काही ठिकाणी दुष्काळाचे सावट असल्याने जनता हवालदिल झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टीव्हीवर भूलथापा मारून स्वत:चीच पाठ थोपटवून घेण्यात मशगूल आहेत,’ अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
जळगाव जिल्हा भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा हल्लाबोल केला. यावेळी भाजपचे विविध नेते देखील उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना भाजप सरकारच्या काळात परवानगी मिळाली होती. ती कामे सुरू देखील झाली होती. मात्र अनेक धरण प्रकल्पांची सुरू असलेली कामे या सरकारने बंद पाडली. ९० टक्के काम झालेल्या वाघूर धरणासाठी सध्याच्या सरकारने रुपयाचा सुद्धा निधी न दिल्याने ४५ हजार एकर शेती सिंचनापासून वंचित राहिली आहे. राज्यातील अपूर्ण प्रकल्पांची अशीच अवस्था आहे. जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागात पैसाच नसल्याने कुठलीही कामे झाली नाहीत. त्यामुळे हा विभाग अस्तित्वात आहे की नाही? अशी अवस्था झाली असल्याची टीका देखील महाजन यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र पेटवायला मला केवळ दोन मिनिटे लागतील…’- खासदार संभाजीराजे
- ‘खायचं कोणाचं आणि गायचं कोणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण…’; चित्रा वाघ यांचा खोचक टोला
- ‘ओ सरकार आता बास झालं…’; पुरबाधित शिये गावच्या गावकऱ्यांची पंचगंगेत उडी
- ‘2047 सालच्या भारताची परिस्थिती ठरवण्यात आपले कृषिक्षेत्रासह शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची’
- पुणेकरांना दिलासा : निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

