Share

‘महाराष्ट्र पेटवायला मला केवळ दोन मिनिटे लागतील…’- खासदार संभाजीराजे

Published On: 

पुणे : मराठा समाजाला अद्यापही आरक्षणाची प्रतीक्षा असून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाज हा आक्रमक झाला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता मराठा समाज हा पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महापूर आणि राज्यातील कोरोनाची स्थिती ओसरल्यानंतर आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन करणार आहे.

दरम्यान, आज मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा समन्वयक, विविध मराठा संघटनांचे कार्यकर्ते हे या बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी मराठा समाजातील व्यक्तींच्या बाजू, भावना ऐकून घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी पुढील भूमिका जाहीर केली. आता पुढच मूक आंदोलन नांदेड येथे होणार असल्याचं संभाजीराजेंनी पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये म्हटलं आहे.

तसेच या भाषणात बोलताना त्यांनी आपण ही लढाई संयमाने लढत असल्याचं अधोरेखित केलं. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्ते आणि समन्वयकांसमोर बोलताना संभाजीराजेंनी महाराष्ट्र दोन मिनिटांमध्ये पेटवू शकतो पण मी तसे करणार नाही कारण मी छत्रपती घराण्याचा वंशज आहे. माझ्यावरती पेटवण्याचे संस्कार नाहीत.’ असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान संभाजीराजेंनी जुलै महिन्यात कोल्हापूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांची भेटी घेतल्यानंतर तर्कवितर्क लढवणाऱ्यांनाही आपल्या भाषणामधून चांगलाच टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!