Share

‘खायचं कोणाचं आणि गायचं कोणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण…’; चित्रा वाघ यांचा खोचक टोला

Published On: 

मुंबई : अनेक दिवसांपासून भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये शाब्दिक हल्लाबोल सुरु आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी चांगलंच धारेवर धरलं होतं. भाजपने संजय राठोड यांच्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

आता चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर तोफ डागली आहे. सर्वज्ञानी संजय राऊत यांना राहुल गांधी यांनी कौतुकाची थाप काय दिली त्यावर स्वामीनिष्ठा परस्वामीनिष्ठा उफाळून येणं स्वाभाविकच आहे. खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे आपलं वागणं कौतुकास्पद पण स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी बलात्कारासारख्या गंभीर विषयाचंही राजकीय भांडवल करणं हे निंदनीयचं, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

चित्रा वाघ यांनी याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. पूजा चव्हाण प्रकरण, आणि संजय राठोड यांच्याबाबत पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. पूजा चव्हाणच्या मारेकऱ्यांनी कोण अभय देत आहे आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची काय भूमिका आहे हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. नव्या अभिनेत्रीला संधी देतो म्हणून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला आत्ताच स्थानिकांनी चोप दिला, असं देखील त्यांनी यात म्हटलं आहे.

‘महाविकास आघाडीतील किती जणांचे हात महिलांविरोधी कृत्यांमध्ये बरबटलेले आहेत हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. आपल्या अत्याचाराविरूद्धसुद्धा माझ्या एका भगिनीने न्याय मिळण्याकरिता उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत. आम्ही आता या अत्याचारी प्रवत्तीविरूद्ध लढायचे ठरवले त्यामुळेच की काय आपल्याला भितीपोटी असे दाखले द्यावे लागतात,’ असं म्हणत त्यांनी संताप देखील व्यक्त केलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!