Share

पुणेकरांना दिलासा : निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे काल(०८ ऑगस्ट)उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. सध्या या दोन्ही शहरांचा पॉझिटिव्हिटी रेट हा ३ टक्क्यांच्या आसपास आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सूट देण्यास अनुकूलता दर्शवल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दोन्ही शहरांमध्ये आजपासून सोमवार ते शुक्रवार सर्व सेवा, दुकाने, व्यापार हे रात्री ८ वाजेपर्यंत तर शनिवार-रविवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. यासोबतच, हॉटेल्स सर्व दिवशी रात्री १० पर्यंत सुरु राहतील अशी घोषणा देखील अजित पवार यांनी केली.

दरम्यान, पुणेकरांना निर्बंधांमध्ये सूट मिळण्यासह आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. आज नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. पुणे शहरात आज नव्याने ११९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८९ हजार ०२१ इतकी झाली आहे. तर, २३६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७८ हजार ११९ झाली आहे.

यासोबतच, आज एकाच दिवसात ६ हजार ३१३ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २९ लाख ५० हजार २७६ इतकी झाली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या २ हजार ०८६ रुग्णांपैकी १९९ रुग्ण गंभीर तर ३४० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर मृतांच्या संख्येत देखील घट झाली असून पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ८१६ इतकी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!