जळगाव : एकेकाळचे भाजपचे दिग्गज नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ खडसेंनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप करत खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला असून खडसेंनी आता भाजपच्या नेत्यांवरच प्रहार करण्यास सुरुवात केली आहे.
एकनाथ खडसे यांचा एक कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत असून यात त्यांनी भाजप आमदार व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खालच्या भाषेत टिपण्णी केली आहे. खडसेंच्या विधानाचा आता गिरीश महाजन यांनी समाचार घेतला आहे. ‘मी ऑडिओ क्लिप ऐकली, त्यात खडसेंचा दोष नाही. वाढते वय, अनेक आजार यामुळे खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अशातच, राष्ट्रवादीत जाऊनही त्यांना आमदारकी मिळाली नाही. त्यांच्या मुलीला देखील लोकांनी नाकारले, त्यामुळे त्यांची मानसिकता बिघडली आहे.’ असं चोख प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे ?
वडगाव बुद्रुक तालुका जामनेर मधील एका व्यक्तीने गावातील गंभीर पाणी प्रश्नासंदर्भात खडसेंना मदतीसाठी फोन केला होता. यावेळी, खडसेंनी या व्यक्तीला गावाचे व तालुक्याचे नाव विचारले असता ‘पाणी नाही, तर तुझा आमदार कुठे मेला?’ असा सवाल या ग्रामस्थाला केला. यावर त्याने ते फोन उचलत नाहीत असं प्रत्युत्तर दिलं. यावर, ‘पोरीचा फोन उचलतो तो फक्त’ असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं आहे.
पुढे त्यांनी या ग्रामस्थाची तक्रार एकूण गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठीचे आश्वासन देखील दिले. मात्र, जामनेर मतदारससंघाचे आमदार भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन हे असून त्यांच्याबद्दल खडसेंनी केलेल्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे. याआधी देखील महाजन आणि खडसेंमधील वाद अनेकदा उफाळून आल्याचं समोर आलं होतं. आता खडसेंच्या या विधानामुळे पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये ठिणगी पडली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजप खा.भामरेंकडून ऑक्सिजन प्रकल्पासाठी एक कोटींची मदत
- ढगाळ वातावरण, तरीही पारा ४२ अंशावर
- कौतुकास्पद! नाशिकच्या एकलहरे गावात ‘घर तिथे ऑक्सिजन बेड’चा निर्णय
- नाशिक ऑक्सिजन दुर्घटना, केंद्राकडून मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत
- लसींचे दर उत्पादकांवर सोपवल्यास काळाबाजार वाढेल, सचिन पायलट यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

