धुळे : शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी खासदार निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार याविषयीचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे सुपुर्द केले. प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली.
कोरोना बाधितांना ऑक्सिजनची गरज भासते आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी स्थानिक पातळीवर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला आहे. प्रकल्पासाठी उद्योजक, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. त्यानुसार संजय सोया कंपनीने या आवाहनाला प्रतिसाद दिला.
तसेच आमदार फारुख शाह यांनी एमआयडीसीतील स्वत:च्या जागेसह ८० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर खासदार सुभाष भामरे यांनी एक कोटी रुपये देण्याचे जाहीर केले होते. याविषयीचे पत्र त्यांनी दिले. निधी प्राप्त झाल्याने कामाला तत्काळ सुरुवात करण्यात येणारे.
महत्वाच्या बातम्या
- ढगाळ वातावरण, तरीही पारा ४२ अंशावर
- कौतुकास्पद! नाशिकच्या एकलहरे गावात ‘घर तिथे ऑक्सिजन बेड’चा निर्णय
- नाशिक ऑक्सिजन दुर्घटना, केंद्राकडून मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत
- लसींचे दर उत्पादकांवर सोपवल्यास काळाबाजार वाढेल, सचिन पायलट यांचा इशारा
- कोरोना रोखण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
