टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. अशातच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मोठ विधान केले आहे.
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गिरीश महाजन यांनी विधासभा निवडणुकीविषयी बोलताना कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी कॉंग्रेस म्हणजे वादळात भरकटलेलं जहाज अस विधान केले आहे तसेच बाहेरुन आलेल्या नेत्यांना आपापल्या भागाचा विकास करायचा आहे, सर्वांना राज्यातील नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वावर विश्वास आहे असंही महाजन म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी आघाडीचे केवळ ४० आमदार निवडून येतील अस विधान केले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या या परिस्थितीला अंतर्गत कलह जबाबदार असल्याचही महाजन म्हणाले. ‘शरद पवारांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना नाराज केल्याने ते आमच्याकडे आले तसेच भाजपमध्ये आलेले नेते विनाअट पक्षात आले आहेत असंही महाजन म्हणाले. यावेळी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले.
दरम्यान, आज भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले. यात राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर. तसेच राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
#पक्षांतर : ईडी’च्या चौकशीची भीती दाखवून पक्ष प्रवेश घडवले जात आहेत : जयंत पाटील
गडकरींची मोठी घोषणा, आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शिक्षणाची गरज नाही
व्ही. जी. सिद्धार्थ – भारतीय कॉफी किंगचा मनाला चटका लावणारा अंत
मंगळवेढा तालुक्यातील पाच गावांचे उपसा सिंचन योजनेसाठी सर्वेक्षण करणार : महाजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

