Share

मंगळवेढा तालुक्यातील पाच गावांचे उपसा सिंचन योजनेसाठी सर्वेक्षण करणार : महाजन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील सात गावांपैकी सलगरे बुद्रुक आणि सलगरे खुर्द ही दोन गावे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समाविष्ठ करण्यात आली आहेत. उर्वरित पाच गावांचा समावेश करण्यासंदर्भात पुढील तीन महिन्यात सर्वेक्षण करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. विधानसभेत मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसंदर्भात सदस्य भारत भालके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना महाजन बोलत होते.

महाजन म्हणाले, मंगळवेढा येथील लवंगी, आसबेवाडी, शिवनगी, सोड्डी आणि येळगी या पाच गावांचे अडीज हजारांचे क्षेत्रफळ असल्याने पुढील तीन महिन्यात त्याचे सर्वेक्षण करून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समाविष्ट करण्याबाबत कारवाई करण्यात येईल. तसेच कालवा सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार जेथे जेथे दुष्काळजन्य परिस्थिती होती आणि पाण्याची गरज होती तेथे नियोजनात नसतानाही पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!