टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठ विधान केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील सध्या पुण्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. यावेळी बोलताना ‘इडीच्या चौकशीची भीती दाखवून साम, दाम, दंड, भेद वापरून पक्ष प्रवेश घडवले जात आहेत. बरं झालं आमच्यातल्या भाकड गायी जात आहेत. आता आम्ही ताज्या दमाच्या लोकांना संधी देऊ अस विधान केले आहे.
दरम्यान पुढे बोलताना जयंत पाटील यांनी ‘युतीत मुख्यमंत्री कोण अशी स्पर्धा सुरु आहे. युती एकच असताना दोन मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे’. हा प्रकार पहिल्यांदाच बघत असल्याचा टोलाही त्यांनी भाजप सेनेला लगावला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

