मुंबई : २०१८ मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर ऑस्ट्रेलिया संघातील दोन खेळाडूंना एका वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागले. मात्र हे प्रकरण पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील बॉल टेम्परिंग प्रकरणाबाबत नवीन खुलासा केल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज आणि माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टने खडे बोल सुनावले आहे. यावेळी बोलताना गिलख्रिस्ट म्हणाला की, ‘येणाऱ्या काही काळात बॉल टेम्परिंग चा विषय पुन्हा पुन्हा नव्याने पुढे येत राहणार आहे. याचे नुकसान ऑस्ट्रेलिया क्रिकेटला सोसावे लागु शकते. तेव्हा बॅनक्रॉफ्ट सारख्या खेळाडुकडून या प्रकरणाची अधीक माहिती उघड करण्यासाठी ते योग्य क्षणाची वाट बघत आहे.’ असे गिलख्रिस्ट म्हणाला.
या प्रकरणात जर रोज नवनवीन खुलासे होत राहिले तर याला क्रिकेट ऑस्ट्रेलिया जबाबदार राहील. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने घाईत हे प्रकरण लवकर मिटवले. जर त्यांनी काळजीपुर्वक या प्रकरणाची चौकशी केली नाही, असा आरोप गिलख्रिस्टने केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१८ साली झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान बॉल टेम्परिंगच्या प्रकरणात कॅमेरून बॅनक्रॉफ्टने बॉल टेम्परिंगची माहिती ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आधीच होती, असे सांगितले. या घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांसाठी बंदी घातली होती, तर तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर १२ महिन्यांसाठी बंदी घातली होती.
महत्वाच्या बातम्या
- जडेजाच्या तलवारबाजीची धोनीनं केली हुबेहूब नक्कल ; उथप्पालाही आवरले नाही हसू
- कोरोना संसर्ग, मृत्यू टाळण्यासाठी प्लाझ्मा थेरपी लाभदायक नाही; आयसीएमआरचे मत
- सकारात्मक! उस्मानाबादेत कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ
- ‘अजितदादा मंत्रालयात आले, आता मुख्यमंत्री ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ कधी करणार ?’
- पुण्यात गँगवारमध्ये मृत्यू झालेल्या गुंडाच्या अंतयात्रेला १२५ दुचाकी; ८० जणांना अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

