Share

जडेजाच्या तलवारबाजीची धोनीनं केली हुबेहूब नक्कल ; उथप्पालाही आवरले नाही हसू

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा स्थगित केली.आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेले परदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत.

सध्या सर्व आयपीएल फ्रँचायझी या स्पर्धेदरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत महेंद्रसिंह धोनी दिसत आहे. सीएसकेनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये धोनी आणि रॉबिन उथप्पा हे दोघं दिसत आहेत. यावेळी धोनीने रविंद्र जडेजाची नक्कल केली आहे. या व्हिडिओत धोनी रविंद्र जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल करतो. धोनीनं त्याच्या अंदाजात जडेजाची नक्कल केली. ही नक्कल पाहून उथप्पाही हसू लागला.

रविंद्र जडेजा अर्धशतक झळकावल्यानंतर बॅटनं तलवारबाजीचं प्रात्याक्षिक करत आनंद व्यक्त करतो. त्याची ही स्टाईल क्रिकेट विश्वात चांगलीच लोकप्रिय होती. त्याच क्षनाची नक्कल यावेळी धोनीने केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!