औरंगाबाद : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी तसेच कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असला तरी सद्यस्थितीत नागरिकांकडून लसीकरणास अल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ४५ वर्षावरील नागरिकांसाठीचा सुमारे ३५ हजार लसींचा साठा महापालिकेकडे पडून आहे. नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्यामुळे आता लसीची सक्ती करण्याचे नियोजन सुरू आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना दंड आकारला आणार आहे, असा इशारा पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (दि.१६) दिला.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी २१ जून पासून लसीकरण सुरू करण्याचा शासन हालचाली सुरू आहेत. मात्र अजून पर्यंत यासंदर्भात पालिकेला आदेश प्राप्त झालेले नाही. १६ जानेवारीपासून औरंगाबाद शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली आहे. आजवर शहरातील ३ लाख ३५ हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे. तर सुमारे ६० हजार नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. पालिकेने शहरात ११५ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करत जम्बो मोहीम हाती घेतली. मात्र अचानक लसींचा पुरवठा कमी झाल्याने यातील अनेक केंद्र बंद करावी लागली.
मागील महिन्याभरापासून ४५ प्लस नागरिकांसाठीच लस राखून ठेवल्या आहेत. लस घेणार्यांची संख्या वाढावी, यासाठी दिव्यांग, ड्राईव इन लसीकरण यासह विविध प्रयोग प्रशासनाने राबवले. मात्र तरी देखील लसीकरणाचे प्रमाण वाढत नसल्यामुळे आता पालिका लसीकरणाची सक्ती करण्याचे नियोजन करीत आहे. ४५ वर्षीय ज्या नागरिकांनी लस घेतली नाही, त्यांना दंड आकरण्याचा देखील विचार सुरु असल्याचे यापूर्वीच आयुक्त पांडेय यांनी जाहीर केले आहे. २१ जूननंतर शासन आदेशान्वये ४५ वर्षाच्या खालील नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ भारतीय महिला क्रिकेटपटुंनी मोडला गांगुली-द्रविड-कुंबळेचा विक्रम
- …तर मी दोन वर्षापुर्वीच निवृत्त झालो असतो, रॉस टेलरचा धक्कादायक खुलासा
- भारताविरुद्ध कसोटी मालिकेआधी इंग्लंडच्या ‘या’ खेळाडुंने ठोकले झंझावती शतक
- कसोटी महाभारतासाठी! भारतीय संघ सज्ज, विराटने केला फोटो ट्विट
- अखेर अझरुद्दीन एचसीएच्या अक्ष्यक्षपदावरुन निलंबीत; सदस्यत्वही रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

