🕒 1 min read
मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये पोहोचले आहे.
डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील न्युझीलंड संघाचा महत्वाचा अनुभवी खेळाडू रॉस टेलरने एक धक्कादायक खुलासा केला आहे. दोन वर्षापुर्वीच निवृत्ती स्विकारण्याचा विचार केला होता असे रॉस टेलरने सांगितले आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमिवर बोलताना टेलर म्हणाला,’जर आमचा संघ २०१९चा विश्वचषक जिंकण्यात यशस्वी झाला असता तर मी निवृत्तीची घोषणा करणार होतो. मात्र दुर्दैवाने ते स्वप्न पुर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे मी निवृत्तीचा निर्णय टाळला.’ असे त्याने सांगितले.
३७ वर्षीय रॉस टेलरने २००७ मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. टेलरने आतापर्यंत १०७ कसोटी सामन्यातील १८७ डावात फलंदाजी करताना ४५.२२च्या सरासरीने ७५०७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १९ शतक आणि ३५ अर्धशतके केली आहे. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर न्युझीलंडचा यष्टीरक्षक बीजे वॅटलिंग हा निवृत्त होणार आहे. मात्र रॉस टेलरने अद्दापही याबद्दल काहीच घोषणा केलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
- आता शिवसेनेला महाराष्ट्रातून संपवल्याशिवाय राहणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे
- एकदोन नव्हे तर शेकडो गुंडांचा एन्काऊंटर करणारे प्रदीप शर्मा कोण आहेत ?
- पिशोर-सिल्लोड रस्त्यालगत आढळला वृद्धाचा कुजलेला मृतदेह
- ‘आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार’, चंद्रकांत खैरेंची माहिती
- ‘संपूर्ण शिवसेनाच आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
