मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा एकमेव कसोटी सामना १६ जुन पासुन सुरु झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजानी वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवसाअखेर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने ६ गडी गमावत २६९ धावांची मजल मारली.
इंग्लंड दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात खेळायला उतरताच भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनी एका ऐतीहासीक विक्रमाची नोंद केली आहे. मिताली आणि झुलन या दोन्ही खेळाडू भारताकडुन सर्वाधीक कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटु बनल्या आहेत. तसेच हा विक्रम करताना त्यांनी भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांचा सर्वाधीक काळ कसोटी क्रिकेट खेळण्याचा विक्रम मोडीत काढला आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात केवळ सचिन तेंडुलकर या दोघीपेक्षा जास्त आहे. मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनी १४ जानेवारी २००२ रोजी कसोटी पदार्पण केले होते. त्यांची एकुण कारकिर्द १९ वर्षाची झाली. महिला क्रिकेटपटुंच्या यादीत वेरा बर्ट आणि मेरी हाईड या दोन खेळाडुंची कारकिर्द या दोघीपेक्षा जास्त आहे. महिला क्रिकेटमध्ये मिताली राज ही सर्वाधीक काळ एकदिवसीय क्रिकेट खेळणारी एकमेव खेळाडू आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार’, चंद्रकांत खैरेंची माहिती
- ‘झारीतील शुक्राचार्य नेमके कोण? मराठा समाजाच्या मागण्या का मान्य होत नाहीत?’
- ‘गहिनीनाथ गडाच्या पायी वारीला परवानगी द्या’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
- ‘..तर महिनाभरात तिसरी लाट येणार’, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
- ‘शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार’, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
