Share

अखेर अझरुद्दीन एचसीएच्या अक्ष्यक्षपदावरुन निलंबीत; सदस्यत्वही रद्द

Published On: 

मुंबई : नियमभंग केल्याच्या आरोपावरुन भारताचा माजी कर्णधार खेळाडू मोहम्मद अझरुद्दीनला हैदराबाद क्रिकेट असोसीएशनच्या अध्यक्षपदावरुन निलंबीत करण्यात आले आहे. तसेच अझरुद्दीनचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. यासह असोसीएशनने अझरला नोटीसही बजावली आहे.

मोहम्मद अझरुद्दीनवर दुबईतील एका क्रिकेट क्लबचा सदस्य आहे असा आरोप ठेवण्यात आला होता. हा क्रिकेट क्लब बीसीसीआयने मान्यता न दिलेल्या स्पर्धेत खेळत असतो. यासंदर्भातील माहिती अझरुद्दीनने असोसीएशनपासुन लपवली आसल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. या प्रकरणात हैदराबाद क्रिकेट असोसीएशनने अझरला कारणे दाखवा अशी नोटीसही बजावली आहे. तसेच ही चौकशी पुर्ण होईपर्यंत त्याला अध्यक्षपदावरुन निलंबीत करण्यात आले आहे आणि सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.

अझहरुद्दीन २७ सप्टेंबर २०१९ रोजी एचसीएचा अध्यक्ष बनला होता. मोहम्मद अझहरुद्दीनने भारताकडून 334 एकदिवसीय सामन्यात खेळताना ३६च्या सरासरीनं ९३७८ धावा काढल्या आहेत.यादरम्यान त्याने ७ शतके आणि ५८ अर्धशतक झळकाली आहे. तर कसोटीमध्ये ४५.०३ च्या सरासरीनं ६२१५ धावा काढल्या आहेत. यात २२ शतक आणि २१ अर्धशतकाचा समावेश आहे.अझहरुद्दीनवर २००० साली मॅच फिक्सिंगचा आरोप लागल होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!