मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये पोहोचले आहे.
डब्ल्युटीसी अंतिम सामन्यासाठी एक दिवसापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. यापुर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाचा जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची जर्सी परिधान करत एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करुन विराटने अंतिम सामन्यासाठी सज्ज असल्याचा इशारा दिला आहे. या फोटोत उजवीला सलामीवीर रोहीत शर्मा बसलेला आहे. त्याच्या बाजुला आर अश्विन, प्रशिक्षक रवि शास्त्री, विराट कोहली, अंजिक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी हे रांगेत बसले आहेत.
???????? pic.twitter.com/efvCsjizpe
— Virat Kohli (@imVkohli) June 17, 2021
तर यांच्या मागे उजवीकडुन वृद्धीमान साहा, मोहम्मद सिराज, उमेश यादव, हनुमा विहारी, शुभमन गील, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि रिषभ पंत हे उभे आहे. तर या ट्विटमध्ये असलेल्या दुसऱ्या फोटोत टीम इंडियाचा संपुर्ण सपोर्ट स्टाफ फिजीओ वगैरै हे भारतीय संघासोबत दिसत आहे. मागील बाजुला मैदानातील प्रेक्षागृह दिसत आहे. प्रेक्षागृहाच्या उजव्या बाजुला न्युझीलंडचा राष्ट्रीय ध्वज आणि डाव्या बाजुला भारताचा तिरंगा दिसत आहे. या ट्विटला कॅप्शन देताना विराटने भारताचा तिरंगा असलेले इमोजी पोस्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अभिनेत्रीने घरात भूत राहत असल्याचा सांगितला भयावह अनुभव
- एकदोन नव्हे तर शेकडो गुंडांचा एन्काऊंटर करणारे प्रदीप शर्मा कोण आहेत ?
- पिशोर-सिल्लोड रस्त्यालगत आढळला वृद्धाचा कुजलेला मृतदेह
- ‘आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार’, चंद्रकांत खैरेंची माहिती
- ‘संपूर्ण शिवसेनाच आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार ?’


